सोलापुरात रेल्वे ट्रॅकवर सापडला मोठा दगड; लोको पायलटच्या सतर्कतेमुळे उधळला कट

solapur-railway-accident

सोलापूर (क्राइम रिपोर्टर विनोद लोखंडे) : उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानातील अजमेर येथे रेल्वे अपघाताची कट रचणाऱ्याची घटना समोर आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही रेल्वे अपघात घडवण्याठी कट रचला गेल्याचे समोर आलं आहे. सोलापुरमध्ये रेल्वे ट्रॅकवर सिमेंटचा मोठा दगड ठेवण्यात आला होता. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासन अलर्ट झालं असून कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.


उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेरनंतर आता महाराष्ट्रातील सोलापूरमध्येही मालगाडी उलटवण्याचा कट उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर सिमेंटचा मोठा दगड सापडला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. याप्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ विभाग अभियंत्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून पूर्वेला ७०० मीटर अंतरावर सिग्नल पॉईंटजवळ रेल्वे रुळावर मोठा सिमेंटचा दगड ठेवून अपघात घडवून आणण्याच्या प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठ विभाग अभियंता कुंदन कुमार यांनी अज्ञात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे.


रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून सातशे मीटर अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा मोठा दगड ठेवला. लोको पायलट रियाज शेख आणि जेई उमेश इलेक्ट्रिक रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीसाठी टॉवर वॅगनला सोलापूर येथून कुर्डुवाडीला घेऊन येत होते. त्यांनी रुळावर दगड पाहिल्यानंतर २०० मीटर आधीच मालगाडी थांबवली आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here