जिल्ह्यातील १२ हजारांच्यावर रुग्णांनी केली आहे कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.१५) कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ५६५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरोना विषाणूवर मात करणार्‍या रूग्णांची संख्या १२ हजाराच्या पार गेली आहे.
आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टच्या आधारे जिल्ह्यात एकूण ५६५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १३८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल अमळनेर-५९ व चोपडा-५८ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण-३८; भुसावळ-२६; पाचोरा-५; भडगाव-५०; धरणगाव-२९; यावल-१९; एरंडोल-२९; जामनेर-११; रावेर-६; पारोळा-३२; चाळीसगाव-३८; मुक्ताईनगर-१३; बोदवड-३ व बाहेरच्या जिल्ह्यातील दोन रूग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज ३७३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्‍या रूग्णांचा आकडा १२ हजारांच्या पार गेला आहे. आज दिवस अखेरीस एकूण १२१०१ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज दिवसभरात तीन मृत्यू झाले असून आजवरच्या कोरोनामुळे मृतांची संख्या ६५० इतकी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here