पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : रांजणगाव एमआयडीसीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वास्तव करुन असलेल्या २१ बांगलादेशी नागरिकांना ग्रामीण पोलीस दलाने अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये १५ पुरुष, ४ महिला व २ तृतीयपंथी यांचा समावेश असून, धक्कादायक बाब म्हणजे या सर्व जणांकडे भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे आढळून आली आहेत.
या बांगला देशी नागरिकांपैकी ९ जणांकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड व एकाकडे बनावट मतदान कार्डही आढळून आले आहे.







