तलवार घेवून दहशत माजविणारा तरुण नशिराबाद पोलिसांनी केला जेरबंद

arrest
file photo

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर अजहर खान) : तालुक्यातील कानसवाडे गावातील बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीवर नशिराबाद पोलीसांनी शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कृष्णा वासुदेव कोळी (वय २४ रा. कानसवाडे ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील कानसवाडे गावातील बसस्थानक आवारात संशयित आरोपी कृष्णा कोळी हा तरूण बेकायदेशीरपणे तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी.मनोरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

 

पथकाने शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी कृष्णा कोळी याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ शरद भालेराव हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here