माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन

gulabrao-devkar

धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : शहरातील आजपर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बालाजी मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या ऐतिहासिक रॅलीमुळे अख्खे धरणगाव शहर दणाणले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जळगाव ग्रामीणची उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, जळगाव महानगराध्यक्ष एजाज मलीक, कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, राजेंद्र चौधरी, श्रीराम पाटील, सामाजिक न्यायचे प्रदेश सरचिटणीस रामचंद्र जाधव, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाचे धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष उमेश पाटील, काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही.डी.पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी, लकी टेलर आदी उपस्थित होते.

 

दरम्यान, सभेच्या ठिकाणी प्रमोद पाटील, एजाज मलिक, शालिग्राम मालकर, रामचंद्र जाधव, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, गुलाबराव वाघ, नीलेश चौधरी, रमेश पाटील, प्रतिभा शिंदे, डॉ.व्ही.डी.पाटील, अर्जुन पाटील, संतोष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here