मुक्ताईनगर अपक्ष उमेदवारावर गोळीबार; राजकीय क्षेत्र हादरले

gun-fire
file photo

सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : उमेदवारी माघारीनंतर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला जोर आला आहे. मात्र याच दरम्यान बोदवड तालुक्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवारावर प्रचार रॅली सुरू असतांना दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्र हादरले आहे.

 

याबाबत समजलेले वृत्त असे की, मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघामधून विनोद सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यांनी आज शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे.

 

त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र यामुळे राजकीय क्षेत्र हादरले असून, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here