जयश्री महाजनांच्या समाजसेवेचे पुण्य निवडणुकीत यश देईल; प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांचा विश्वास

jayshree-mahajan

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला शहरात वाढता प्रतिसाद मिळत आहे. काल (दि.७) सायंकाळच्या सत्रात जळगावच्या भास्कर मार्केट आणि पोलीस लाईन परिसरात जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीने आणि प्रचारफेरीतील घोषणा आणि ढोलताशांच्या आवाजाने परिसरात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केले होते. परिसरातील नागरिकांनी जयश्रीताईंच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, त्यांना भरभरून पाठिंबा दिला.

 

प्रचार सभेत महाविकास आघाडीचे नेते, स्थानिक कार्यकर्ते, आणि समर्थकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या जोशात आणि जोमात रस्ते गजबजून गेले होते, आणि “जयश्रीताई आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा परिसरात घुमू लागल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाच्या, कर्तृत्वाची चर्चा करत त्यांच्या समाजसेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. परिसरातील व्यापाऱ्यांनी त्यांच्या गाळ्यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत जयश्री महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यावर लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन जयश्री महाजन यांनी व्यापाऱ्यांना देत त्यांना आश्वस्थ केले.

 

दरम्यान महिलांनी ठिकठिकाणी जयश्री महाजन यांचे औक्षण केले, फुलांचा वर्षाव करत त्यांना आशिर्वाद दिला आणि त्यांच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला. ठिकठिकाणी महिलांनी त्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावत “जयश्री महाजन विजयी असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जयश्री महाजन यांची उमेदवारी म्हणजे नारीशक्तीचा सन्मान असल्याने, महिलांचा हा पाठिंबा जयश्री महाजन यांच्या नेतृत्वावरील शहरातील नागरिकांच्या विश्वासाचे द्योतक मानला जात आहे.

 

या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील व्यापारी, उद्योजक, महिला यांच्यासह विविध समाजघटक जयश्री महाजन यांना साथ देण्यासाठी एकवटले आहेत. जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगावच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here