सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी व इतर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये या लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागू नये साठी पोलीस प्रशासन देखील योग्य ती कार्यवाही करत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात फेरी (रुट मार्च) काढण्यात येत आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज (दि.९) सावदा शहर व चिनावल गाव परिसरातील रुट मार्च करण्यात आला.
सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावदा शहर व चिनावल गावी आयटीबीपीचे २ अधिकारी व ३० जवान तसेच सावदा पोलीस स्टेशनचे २ अधिकारी व १० कर्मचारी हजर होते.







