सावदा ग्रामीण रूग्णालयात दर्जेदार मोफत उपचार सुविधा सुरू करण्यासाठी रोहिणी खडसे पाठपुरावा करतील याचा विश्वास – सोपान पाटील

रोहिणी खडसे

सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी सावदा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली परंतु विद्यमान लोकप्रतनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता रोहिणी खडसे या आमदार झाल्यास त्या पाठपुरावा करुन सावदा ग्रामीण रूग्णालयात आवश्यक पद भरती, औषधपुरवठा, यंत्रणा उपलब्ध करुन देऊन गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करुन देतील, असा विश्वास सोपान पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या मतदार संवाद दौरात ठिकठिकाणी ग्रामस्थांशी ते संवाद साधत होते.

 

मुक्ताईनगर विधानसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांचा लुमखेडा, भिलवस्ती, उदळी खु, उदळी बु, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, रायपुर, सुदगाव,मांगी चूनवाडे थोरगव्हाण या गावात मतदार संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. संवाद दौऱ्याच्या सुरुवातीला माजी आमदार स्व.आर.आर. पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावागावात माता भगिनींनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत ग्रामस्थांनी रोहिणी खडसे आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मतदारांनी रोहिणी खडसे यांना त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

 

यावेळी किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटिल यांनी मतदारांशी संवाद साधताना आ एकनाथराव खडसे यांनी नाना विविध विकास कामे करून मतदारसंघाचा विकास केला त्यांनी सावदा आणि परिसरातील गावांमधील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होऊन मोफत उपचार मिळावे यासाठी सावदा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली. ग्रामीण रुग्णालयाची भव्य वास्तू पुर्णत्वास आली आहे परंतु विद्यमान लोकप्रतनिधींकडून याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याने रुग्णालयात आवश्यक डॉक्टर, नर्स, व इतर स्टाफ आणी आवश्यक मशिनरी साठी कोणताही पाठपुरावा केला गेला नाही त्यामुळे रुग्णालय जेमतेम सुरू असुन सुध्दा रुग्णांवर पाहिजे त्या प्रमाणात उपचार केले जात नाही.

रोहिणी खडसे या आमदार झाल्यानंतर सावदा ग्रामीण रुग्णालयात आवश्यक डॉक्टर नर्स व इतर सर्व पदांची भरती करून उपचारासाठी आवश्यक अत्याधुनिक मशिनरी, औषध साठा यासाठी पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचाराची सोय करतील, याचा विश्वास असून मतदारसंघाचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे सोपान पाटील यांनी मतदारांना आवाहन केले.

यावेळी माजी पं स सदस्य दिपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष किशोर पाटिल,शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अविनाश पाटील, सौ.शारदाताई खडसे चौधरी, मनोज खैरनार, मधुकर पाटील, नितीन पाटील, श्रीकांत चौधरी,शशांक पाटील, रविंद्र महाजन,सचिन महाले, राहुल फेगडे, शांताराम पाटील, दुष्यांत पाटील, ललित पाटिल, बंटी चौधरी, पांडुरंग झांबरे, भागवत कोळी,गजानन कांडेले, जयवंत राजपूत, रविंद्र पाटील,गणेश देवगिरीकर,गफ्फुर कोळी,कमलेश भारंबे,संतोष वाघ,चेतन पाटील,आकाश पाटील,रोहन चऱ्हाटे , चेतन पाटील, संजय पाटील, केतन पाटील, भागवत कोळी, अश्विन तायडे, सिद्धार्थ तायडे, संजय पाटील, गुणवंत पाटील, प्रकाश पाटील, भूषण कोळी, नितीन पाटील, आकाश पाटील, राजू कोळी, ब्रिजलाल कोळी, राहुल चौधरी, समाधान कोळी, विजय पाटील, ईश्वर चौधरी, हर्षल पाटील,भगवान सावळे, गोकुळ कोळी आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here