जळगाव (संपादक सुनिल पाटील) : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महापालिकेला कर्जमुक्त करून शहराच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावणाऱ्या माजी महापौर जयश्री महाजन यांना यंदा आमदार करणारच हा प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांनी निर्धार केला असल्याचे, आज (दि.९) रोजी या परिसरात काढलेल्या प्रचार फेरीत नागरिकांनी जयश्री महाजन यांना आश्वस्थ केले.
शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार फेरीला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे शहराच्या राजकीय वातावरणात नव्या उर्जेची लहर निर्माण झाली आहे. त्यामुळे माजी महापौर म्हणून आपला ठसा उमटवलेल्या जयश्री महाजन यांच्या समर्थकांमध्ये आता त्यांना आमदार म्हणून पाहण्याची उत्सुकता वाढत आहे. जनतेने त्यांना ‘आश्वासक चेहरा’ म्हणून स्वीकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
आज (दि.९) प्रभाग क्रमांक १२ तील स्टेट बँक कॉलनी ते मायादेवी मंदिर परिसरात जयश्री महाजन यांनी प्रचाराकरिता भव्य रॅली काढली होती. या रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या नागरिकांनी जयश्री महाजन यांची महापौर म्हणून कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी महापालिकेला कर्जमुक्त करण्याचे कार्य केले. त्यामुळे शहराच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना आमदारपदी निवडून देण्याचा निर्धार करत जयश्री महाजन यांच्याविषयी आपला विश्वास व्यक्त केला व त्यांचे नेतृत्व शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत मांडले.जयश्री महाजन महापौर ते आमदार हा प्रवास निश्चितच यशस्वी होईल आणि त्या जळगावच्या विकासाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्यात यशस्वी ठरतील हा आशावाद व्यक्त करत आहेत.
प्रचार फेरीच्या समारोपात जयश्री महाजन यांनी मायादेवी मंदिरात जाऊन शहर विकासासाठी व प्रगतीसाठी आपल्यासह जळगावकर नागरिकांचा विजय व्हावा यासाठी ग्रामदेवी मायादेवीची मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत उपस्थित होते.







