भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवत छत्रपती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

karyakarte-in-BJP-jalgaon

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज (दि.१०) भाजप कार्यालय जीएम फाउंडेशन येथे सायंकाळी साडेचार वाजता छत्रपती ग्रुप जळगाव शहर यांचा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

 

गौरव गायकवाड, सनी कोली, कुणाल अडकमोल, पवन सोनवणे, जितेंद्र सोनवणे, बापू गायकवाड, रोहित नाईक, बॉबी बाविस्कर, प्रमोद जोशी, कपिल तायडे, परेश तायडे, विशाल सोनवणे, समाधान सोनवणे, गणेश सोनवणे, संजय सहानी, लखन हिराणी याच्यांसह १०० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

 

या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा, माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील, विक्रांतजी तरसोडिया, राजेंद्र सोनवणे, मनोज भांडारकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश पाटील, अक्षय जेजुरकर, निलेश तायडे व अशोक राठी, अमित काळे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here