शिवप्रेमी सेनातर्फे शिवप्रताप दिवस साजरा

shivpratap-din

धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : प्रत्येक मावळ्याचे रक्त सळसळून निघेल अशी इतीहासिक घटना १० नोव्हेंबर १६५९ रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेऊन चाल करून आलेला आदीलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला.हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरा मध्ये लिहावा असा आहे.

 

आजही अफजल खानाचा वधाचा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही.या दिवसाची आठवण म्हणून १० नोव्हेंबर हा दिवस शिव प्रताप दिवस म्हणून पारोळा तालुक्यातील शेळावे बु /. व हिरापुर तांबोळे या गावात साजरा करण्यात आला.

 

यावेळी संघटनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी व शिवप्रेमी सेना संस्थापक अध्यक्ष मा.योगराज भाऊ लोहार यांनी महाराजांचे प्रतिमेचे अभिषेक करत पूजन व मानवंदना दिली त्या वेळी उपस्थित प्रमोद पाटील (सामाजिक कार्यकर्ते), योगेश पाटील (मनसे सचिव पारोळा), हर्षल साळी (शिवप्रेमी सैनिक), धीरज महाजन (शिवप्रेमी सैनीक), तुषार सोनवणे, राकेश सोनवणे, अभय पाटील, भुपेश पाटील, कल्पेश पाटील, वैभव पाटील आणि कार्यकर्ते शिव प्रेमी सैनीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here