शेतकरीहिताची कामे केल्याने शिवसेनेचा भगवा फडकणारच – गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : दोन्ही शिरसोली रामदेववाडी येथे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादाने मी भारावलो असून तरुणांची साथ आणि थोरात मोठ्याच्या आशीर्वादाने भगवा फडकणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरसोली येथे मेडीयाशी संवाद साधताना बोलत होते.

 

सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीत भगवे तुफान पसरले होते शिरसोली प्रबो, शिरसोली या दोन गावांना जोडणारा पूल, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठ्याच्या योजना, सबस्टेशन, शेतकऱ्यांसाठी ट्रांसफार्मर, विविध सामाजिक सभागृह, ग्राम सचिवालय इमारत, तलाठी कार्यालय व गावअंतर्गत मूलभूत सुविधा तसेच शिरसोली ते धानवड व परिसरातील गावांना जोडणारे रस्ते मंजूर करून गाव जोडण्याचे व शेतकरीहिताचे काम केल्याने शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे तुफान आता कोणीही रोखू शकणार नाही असा नागरिकांमधून सुरू होता.

 

सोबत उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे , रवी कापडणे, जि. प. सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील रमेशआप्पा पाटील, माजी सभापती नंदूआबा पाटील यांच्यासह सरपंच हिलाल भील, रामकृष्ण काटोले, बबन धनगर, शिवदास बारी, विजय काटोले, नितीन बुंदे, प्रकाश रोकडे, गिरीश वराडे, विजय पाटील सर, माजी सरपंच प्रवीण बारी, प्रवीण पाटील, सुनील पाटील, विजय काटोले, बापू मराठे, भगवान पाटील, अनिल बारकू पाटील, अनिल महारू पाटील, उमाजी पांगळे, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत आस्वार, अर्जुन काटोले, निलेश वाणी, सुनील बारी सर, रमजू खाटीक, मुस्ताक मेंबर, मन्यार बिरादरीचे अकील मन्यार, संतोष ताडे, ईश्वर कोळी, अनिल न्हावी, दीपक राठोड, सुनील राठोड, सरपंच भगवान चव्हाण, देविदास राठोड, विकास जाधव, आप्पा राठोड, गोविंदा जाधव, शहाजी पाटील, नंदू वराडे, विनोद मोरे, दीपक पाटील, बंटी वाणी, फकीरा पाटील, सुर्यवंशी बारी मित्र मंडळ, सहकार्य मित्र मंडळ, वीरता मित्र मंडळ एकता मित्र मंडळ , रामराज्य मित्र मंडळ, समता मित्र मंडळ , एकलव्य मित्र मंडळ, शिवराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह महा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी , ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here