ॲड.खडसे रोहिणी एकनाथराव यांच्या प्रचारार्थ सावदा शहरात खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शो

अमोल कोल्हे

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शो गुरुवार (दि.१४) सकाळी ११ वाजता होणार आहे.

 

रोड शो बस स्टॅन्ड समोरील दुर्गा माता मंदिरापासून सुरू होईल व शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन महाविकास आघाडीच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मत देण्याचे आवाहन खासदार अमोल कोल्हे हे नागरिकांना करतील.त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.

 

तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या नागरिक बंधू भगिनींनी व सुद्धा या रोडशोला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here