खोटे नगर जवळ १०८ नंबरच्या ॲम्बुलन्स स्फोट; चालकाच्या प्रसंगावधानाने चौघांचे प्राण वाचले

स्फोट

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : अवघ्या काहीच दिवसांपूर्वी अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची शहरातील घटना ताजी असतांनाच, काल खेडी शिवारातील गॅस सिलेंडरचा स्पोर्ट होऊन चार घर जळाल्याची घटना घडली होती घटना घडली. आज (दि.१३) रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील महामार्गावरील गुजरात पेट्रोल पंपा समोरील महामार्गाच्या पुलावर एका ॲम्बुलन्सला आग लागल्यानंतर ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यात ॲम्बुलन्स चा पूर्ण चक्काचूर झाला.

 

सुदैवाने आग लागल्याने वेळीच वाहनचालक व रुग्ण ॲम्बुलन्स मध्ये बाहेर पडल्याने जीवित हानी टळली. जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल समोरील महामार्गावरील पुलावर रात्री दहाच्या सुमारास एरंडोल हुन जळगावकडे येणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये गिअर बॉक्स जवळ अचानक आग लागली. चालकाने गाडी तत्काळ थांबवली. तसेच महामार्गावरून जिजाऊ नगरातील जय बजरंग मित्र मंडळाचे काही तरुणाच्या मदतीने चालक ॲम्बुलन्स चालकाने ॲम्बुलन्समधील मधील रुग्ण त्याचे नातेवाईक यांना सुखरूप वेळेत बाहेर काढले. आणि अनेक तिथून लगेच दुसऱ्या ॲम्बुलन्स मध्ये रुग्णालयात रवाना केले.

 

 

एरंडोल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग केलेल्या रुग्णाला घेऊन जळगावला येत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला जळगाव शहरातील दादावाडी पुलाजवळ आले असताना अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने स्वतःसह रुग्णवाहिकेतील माता, बाळ आणि डॉक्टर यांना सुखरूप बाहेर काढीत लांब नेले.काही वेळातच रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा स्फोट झाला. चौघांचे थोडक्यात प्राण वाचल्यामुळे चालकाच्या समयसूचकतेचे कौतुक होत आहे. घटनेच्या वेळी दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

राहुल पाटील (वय ३० रा. साकरे ता. धरणगाव) असे रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. तो धरणगाव ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत आहे. दरम्यान, मनीषा रवींद्र भिल (वय २५, रा. बामणे ता. एरंडोल) ही गरोदर महिला त्रास होऊ लागल्याने जवळच्या जवखेडेसिम आरोग्य केंद्रात गेली होती. तेथेच तीची प्रसूती झाली. नंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.

एरंडोल ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर माता व बाळ यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी धरणगाव येथील १०८ रुग्णवाहिका बोलवण्यात आली. चालक राहुल पाटील हा रुग्णवाहिका (क्रमांक एमएच १४ सीएल ०७९१) ही घेऊन एरंडोल येथे आला. तेथून मनीषा भील व त्यांचे बाळ घेऊन डॉ. रफिक अन्सारी यांच्यासह राहुल पाटील याने रुग्णवाहिकेतून एरंडोल येथून जळगाव प्रवास सुरू केला.

दरम्यान, जळगाव शहरातील दादावाडी पुलावर रुग्णवाहिका आली असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे स्पार्कींग झाल्याचे राहुल पाटील याला लक्षात आले. त्याने तात्काळ पुलावर एका बाजूला रुग्णवाहिका थांबवली. खाली उतरून रुग्णवाहिकेतील डॉ. रफिक अन्सारी, रुग्ण मनीषा भिल व त्यांचे बाळ यांना बाहेर काढत लांबवर घेऊन गेला. मात्र ॲम्बुलन्समध्ये आग पसरत गेल्याने ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आवाज एवढा एक किलो ते दीड किलोमीटर पर्यंत आवाज व हादरे बसले. महामार्ग लगत असलेल्या एटीएमच्या काचा फुटल्या व परिसरातील नागरिकांनाही हा आवाज व धक्का जाणवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here