ही विधानसभा निवडणुक जनतेने हातात घेतली आहे; अपक्ष उमेदवार मयुर चंद्रकांत कापसे यांचे प्रतिपादन…

मयुर चंद्रकांत कापसे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करत असलेले मराठा समाजातील युवा,उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार मयुर चंद्रकांत कापसे यांना प्रचारात जळगाव शहरातील वडील धारी मंडळी, माता भगिनी व युवकांचा मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.

जळगाव शहरातील उमेदवारी करत आसलेल्या उमेदवरांपैकी मयुर चंद्रकांत कापसे हे सर्वात कमी वयाचे उमेदवार असून त्यांचे शिक्षण एम.टेक. फार्मासुटिकल पूर्ण झाले असून पी.एच.डी चे शिक्षण घेत असल्याने प्रचारा दरम्यान उच्च शिक्षित तरुण उमेदवार असल्याने मतदारामध्ये सकरात्मक प्रतिसाद मिळत आहे.

शहरात प्रचारा वेळी सर्व समाजातील युवा मतदार, तरुण, सुशिक्षित बेरोजगार यांचे शिक्षण,नोकरी, रोजगार, स्वयं रोजगाराचे प्रश्न प्रामुख्याने मांडल्याने प्रश्नांना वाचा फोडल्याने प्रचारात पाठिंबा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here