नाथाभाऊंच्या कन्या रोहिणी खडसे यांना विधानसभेत पाठवा – रवींद्रभैय्या पाटील

rohini-khadse-and-ravindra-patil

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : माजी मंत्री विद्यमान विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे हे जन सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणुन ओळखले जाते ते मुळातच हाडाचे शेतकरी आहेत मुक्ताईनगर येथील आपल्या शेतात ते सिडलेस जांभुळ, आखाती खजुर यासारख्या पिकांचे उत्पादन घेतात मुळातच त्यांचा पिंड शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समस्यांची जाण आहे. म्हणूनच ते विधानमंडळ सभगृहात आक्रमकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतात गेल्या अधिवेशनांमध्ये त्यांनी कापूस,कांदा आणि केळीचा प्रश्न सातत्याने उचलून धरला आहे यात प्रामुख्याने कापसाला भाव मिळावा किंवा अनुदान मिळावे. त्यांचाच वारसा चालविणाऱ्या रोहिणी खडसे यांना निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रवींद्रभैय्या पाटील यांनी केले.

 

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, केळी उत्पादकांना सी एम व्ही रोगामुळे, व वादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी तसेच केळी महामंडळ लवकर स्थापन करुन त्यांच्या मार्फत केळी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मार्गदर्शन मिळावे यासाठी एकनाथराव खडसे आग्रही राहिले आहेत हे शक्य आहे केवळ त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे आ. एकनाथराव खडसे यांचा हाच वारसा रोहिणी ताई खडसे या सक्षमपणे सांभाळत आहेत शेती व शेतकऱ्यांप्रति असलेल्या आस्थेने रोहिणीताई खडसे या नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतात. वादळ वारा पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करणे असो की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने मोर्चे असो रोहिणी ताई खडसे या नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असतात.

 

जिल्हाधिकारी, संबंधित खात्याचे मंत्री, वरिष्ठ मंत्रालयीन अधिकाऱ्यां पर्यंत त्या निवेदन वा प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न मांडून त्या सोडविण्या साठी प्रयत्नशील असतात. असे हे सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आपला आवाज विधानसभेत मांडण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणुन विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या मतदान यंत्रावर अनु क्रमांक तिन वरील तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबून ॲड रोहिणीताई खडसे यांना बहुमताने विजयी करून आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here