धरणगाव तालुक्यात बी.जी. देशमुख यांची कार्यकर्त्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा..

b-g-deshmukh

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र प्रदेश राज्य ग्रंथालय अध्यक्ष बी जी देशमुख यांनी शिवसेनेच्या व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुका येथील धरणगाव शहरात व साकरे गावात निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

यावेळी ते म्हणाले की, या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार कसे येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्र मे १२ हजार ग्रंथालय असून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये कामाला लागले असून आपण सुद्धा जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव रघुनाथ पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणावे असे आवाहन केले.

 

या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर दादा अत्तरदे,ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष भाजप कमलेशजी तिवारी,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिरीष आप्पा,ग्रामपंचायत सरपंच धनराज सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष देविदास महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,शहर प्रमुख भाजप दिलीप महाजन,भाजपा मेडिया जिल्हाप्रमुख टोनीभाऊ महाजन,शफीभाई शाह,दिपक चौधरी,आदिवासींचे नेते जगलु चव्हाण,भारतीताई चौधरी,सुनीता पाटील,हेमंत चौधरी,पप्पू कंखरे,गोविंदा धनगर,धीरेंद्र पुर्भे,संभाजी कंखरे, सचिन सोनवणे,हेमंत महाजन,साळव्याचे संजू भाऊ नारखेडे,सोपान भाऊ नारखेडे, राजूभाऊ लोहार,उन्नी नायक, भोणे येथील दिनेश पाटील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here