जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहचला असून, सरळ सरळ दोन गुलाबरावांची लढत आता चुरशीची होऊ लागली आहे. प्रचाराला रंगत चढत असतांना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
जळगाव तालुक्यातील कानळदा या गावात शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचार निमित्त आयोजित जाहीर सभेत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कानळदा येथे मतदारांशी संवाद साधतांना गुलाबराव पाटील यांनी सांगितले या महाराष्ट्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना या राज्यामध्ये आल्या शेतकरी महिला युवक असतील यांच्यासाठी अनेक योजना आल्या मुख्यमंत्री लाडके बहीण या योजनेद्वारा महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये त्यातही विरोधकांनी ही योजना लागू होऊ नये यासाठी कोर्टात गेले परंतु काहीही झाले नाही अनेक प्रयत्न केले पैसे येणार नाही योजना पूर्ण होणार नाही परंतु या राज्याने ठरवलंय आमच्या बहिणींना आता १५०० रुपये निवडून आल्यावर २१०० रुपये करणारच यात मात्र शंका नाही.
पुढे ते म्हणाले की, जळगाव ग्रामीण मतदार संघ करोडो रुपयांचे विकास कामे झाली मी जर मंत्री राहिलो नसतो तर एवढी कामे झाली असती का. तुम्ही विचार करा आम्ही गद्दारी केली नाही तर आम्ही उठाव केला त्यामुळेच तेवढा विकास या मतदारसंघात होऊ शकला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ४ वेळा मी निवडून आलो आता सुद्धा तुमच्या आशीर्वादाने मी पुन्हा पाचव्यांदा निवडून येईल तुमच्या आशीर्वादाने मी मोठा आहे. मी गरिबी पाहिली आहे त्यामुळे गोरगरिबांचे काम असतील पगाराचे काम असतील विविध योजनांमध्ये ३ चाकी सायकलचे वाटप असेल विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्या वाटप असेल कीर्तनकारांसाठी साहित्य वाटप यावर्षी ५ हजार भक्तांना आम्ही पंढरपूर घेऊन त्यातही समोरच्या उमेदवार आमच्यावर टीका करतो आम्ही पंढरपूर घेऊन गेलो तुम्ही त्यांना तिरुपती घेऊन जा आम्ही कुठे तुम्हाला आडवा हात दिला आहे स्वतः काही करण्याचे दानत होत नाही आणि दुसऱ्यांवर आरोप करतात जातीपातीचे राजकारण केल जात आहे. परंतु माझी जात हे तुम्ही आहात तुमच्या आशीर्वादाने मी छोट्या समाजाचा असून सुद्धा ४ वेळा निवडून आलोय २० तारखेला अनुक्रम नंबर २ धनुष्यबाण चिनार बटन दाबून पुन्हा मला निवडूनद्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो.
याप्रसंगी आ.चंद्रकांत सोनवणे,संजय पवार,सुभाष अण्णा पाटील या नेत्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. व्यासपीठावर डी जी पाटील, चंद्रशेखर उत्तरदे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,लालचंद पाटील साहेब,कमलाकर पाटील,शिवराज पाटील,राजूभाऊ चव्हाण,संजय पाटील सर,मुकुंद नन्नवरे,विश्वनाथ भाऊ पाटील,ज्योतीताई चव्हाण,जनाप्पा कोळी,शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







