शेतकऱ्यांच्या घरावरून नांगर फिरवणाऱ्या शिंदे सरकारला धडा शिकवा – शरददादा कोळी

शरद कोळी

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : मुक्ताईनगर मतदार संघ निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असुन या अनुषंगाने निवडणूक प्रचारार्थ ऐनपुर येथे शिवसेना( उबाठा) पक्षाचे उपनेते , धाडस संघटना संस्थापक अध्यक्ष शरददादा कोळी यांची प्रचार सभा संपन्न झाली.

 

यावेळी मतदारांशी संवाद साधताना गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फक्त आश्वासनांची खैरात वाटली गेली प्रत्यक्षात काम शुन्य झाले. .झालेल्या कामात भ्रष्टाचार आणि जनतेची दिशाभुल केली गेली. महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव नसल्याने, दूसरीकडे बी बियाणे, कीटकनाशके, खतांच्या किंमतीत झालेल्या प्रचंड दरवाढीने शेतकरी संकटात सापडला आहे. महागाईने जनता होरपळली आहे तरी सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी घेणे देणे नाही योजनांच्या प्रलोभानातून ते मतदारांना विकत घेऊ बघत आहेत परंतु स्वाभिमानी जनता विकली जाणार नाही.हे चित्र बदलवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणूस या माझ्या निशाणी समोरील बटण दाबुन आपले मतदानरूपी आशिर्वाद देऊन सेवेची संधी देण्याची मी उपस्थितांना विनंती केली.

 

यावेळी शिवसेना नेते शरददादा कोळी हे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले विद्यमान आमदारांचे कोळी समाजा विषयीचे प्रेम हे फसवे आहे. त्यांनी कधीच कोळी समाज बांधवांच्या आरक्षणाच्या, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला नाही. कोळी समाज बांधवांच्या प्रश्नांवर राज्यात सर्व प्रथम आ. एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आणि त्यानंतर आता विधान परिषदेत आवाज उठवला कोळी समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण आणि जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी वेळोवेळी आग्रही मागणी केली. अनेक कोळी समाज बांधवांना पक्ष संघटने पासुन पंचायत समिति, जिल्हा परिषद, आणि सहकारी संस्था मध्ये लाल दिव्याच्या गाडी पर्यंत नेतृत्वाची संधी दिली.
याऊलट विद्यमान सत्ताधाऱ्यांनी माझ्या सारख्या कोळी समाजातील गरीब घरातील तरुणाचे नेतृत्व पुढे येऊ नये यासाठी माझ्या भाषणावर सभेवर बंदी घातली, खोटे गुन्हे दाखल करून मला जिल्हा बंदी करून नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जळगाव आणि मुक्ताईनगरला कोळी समाज बांधव उपोषणाला बसले तेव्हा विद्यमान लोकप्रतीनिधींकडून याकडे आधी दुर्लक्ष केले गेले शेवटी लोकआग्रहावरून उपोषणाला कोरडी भेट दिली. आ. एकनाथराव खडसे आणि ॲड रोहिणी खडसे यांनी सर्व प्रथम या उपोषणाला भेट देउन आपला आणि पक्षाचा पाठिंबा दर्शवला. एकनाथ खडसे आणि ॲड रोहिणी खडसे या कायम कोळी समाज बांधवांच्या पाठीशी आहेत.
विद्यमान सत्ताधारी यांना शेतकऱ्याच्या प्रश्ना बाबतीत संवेदनशीलता नाही या सरकारच्या काळात सोयाबीन, मका कापुस, केळी कोणत्याच शेतमालाला योग्य भाव नाही दुसरीकडे खते बियाणे यांची मोठी दरवाढ केली यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसुन सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला असून शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम शिंदे सरकारने केल्याचे शरददादा कोळी यांनी सांगितले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी माजी आमदार अरूण दादा पाटिल,शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, विशाल महाराज खोल, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटिल, माजी प स सदस्य दिपक पाटिल, शिवसेना नेते मनोहर खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश पाटील, पवनराजे पाटिल,रामभाऊ पाटील, संजय पाटील,सचिन महाले, दत्ता पाटील,आत्माराम कोळी,निलेश पाटिल, गफुर कोळी, राजेंद्र कांडेलकर, नितिन पाटिल,मंदार पाटिल, मधुकर पाटील,काशिनाथ पाटील, भगवान महाजन,अमोल महाजन,किशोर पाटील ,अरविंद महाजन, सलमान खान, हैदर भाई, अक्षय महाजन, मोहन कचरे, पवन कपले, गणेश बाविस्कर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here