जळगाव (संपादक सुनिल पाटील) : मुक्ताईनगर मतदासंघांतील माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी आज (दि.१८) सोशल मिडीयावर ‘मी नाथाभाऊ बोलतोय’ हा व्हिडीओ टाकून मतदारांना भावनात्मक आवाहन केले आहे.
या व्हिडीओत ते म्हणतात, यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे.
ते पुढे म्हणाले की, आता तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी माझी कन्या रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे.
त्यांनी सोशल मिडीयावर केलेला हा व्हिडीओ सद्यस्थितीत प्रचंड व्हायरल होत असून, महाराष्ट्रभर या व्हिडीओची चर्चा होत आहे. एकनाथराव खडसे यांनी मतदारांना केलेल्या या भावनात्मक आवाहनाला मतदार कसे प्रतिसाद देतात हे २३ नोव्हेंबरलाच समजणार आहे.







