रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी मतदान करा – मयुर कापसे

मयुर कापसे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव शहराचा विकास अनेक मार्गांनी रोखला गेला आहे. केवळ पोकळ घोषणांच्या आश्वासनांवर जळगावकरांना झुलवत ठेवून, प्रत्येक राजकारण्याने आपला स्वार्थ साधून घेतला. पण आता शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी प्रत्येक जळगावकराने मतदान केले पाहिजे.

 

येत्या २० तारखेला मतदान करताना जळगाव शहरातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षेची तयार करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, शहरात सुशिक्षित बेरोजगार यांना नोकरी, रोजगार, स्वयं रोजगाराच्या नसलेल्या संधी, महिला, महिला बचत गटांच्या सक्षमीकरण साठी नसलेले प्रयत्न, एमआयडीसी मध्ये बंद पडत चालले प्रकल्प, शहरातील मूलभूत सुविधा व रखडलेला विकास, या प्रमुख मुद्यावर विचार करून मतदान करण्याची विनंती करतो, असे आवाहन मयुर कापसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here