जिल्ह्यात ३ हजार ६८३ मतदान केंद्राची निर्मितीसह प्रशासन सज्ज; जिल्ह्यात तगडा बंदोबस्त

मतदान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यात ३ हजार ६८३ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली असून मतदान कामकाज कामी १६ हजार ३५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

जिल्हाभरातील १६ मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हाभरात २९६२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८५३ मतदारांनी गृह मतदानाचा फायदा घेतलेला आहे.

 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आलेला असून एक पोलिस अधिक्षक, २ अप्पर पोलिस अधिकृक्षक, ८ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३३ पॉलिस निरीक्षक, १४९ सहाय्यक / पोलिस उपनिरिक्षक, २५६९ पोलिस कर्मचारी यासोबतच अपर पोलिस महासंचालक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, चाललुचपत प्रतिबंध विभाग, मुंबई रेल्वे यासह इतर विभागांकडील ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, २५ सहाय्यक / उपनिरिक्षक, १३४० पोलिस कर्मचारी, वन विभागाकडील ११७ कर्मचारी, ३००० होमगार्ड, तसेच आयटीबीपी ३ कंपनी, सीआरपीएफ ४ कंपनी, आरपीएफ २ कंपनी, एसएसबी १ कंपनी, मध्यप्रदेश पोलिस ३ कंपनी, एसआपीएफ २ कंपनी असे एकूण १४ कंपन्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. यासोबत जिल्ह्यात १२२ पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेवेळी ड्रोनव्दारे नजर ठेवण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here