महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात, महायुती आघाडीवर

मतदान

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. आज (दि.२३) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

राज्यात कोणाची सत्ता बसणार याचा फैसला आज होणार आहे. मतदार राजाने आपल्या मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकलंय याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये दि. २० ला बंद झालं. तर ९ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता, राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाची धाकधूक वाढली आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर महायुती जागांवर आणि महाविकास आघाडीत चुरस असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक फेरीनिहाय कल बदलणार आहे. त्यामुळे कुणाला किती जागा मिळणार याचे चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here