पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शिरुर येथे एका युवकाने त्याच्या मित्राला बिडी मागितली असता त्याने बिडी देण्यास नकार दिल्याने सदर युवकावर चाकूने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.
याप्रकरणी रशिद हैदरअली खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारेगाव ता. शिरुर येथे राहणाऱ्या रशिद खान याने त्याच्या धीरेंद्रकुमार यादव या मित्राला बिडी मागितली. मात्र धीरेंद्रकुमार याने त्याला बिडी देण्यास नकार दिला असता रशिद याने चाकू घेऊन धीरेंद्रकुमार याच्यावर हल्ला करत छातीवर व मानेवर मारहाण करुन जखमी केले.
याबाबत धीरेंद्रकुमार टन्नू यादव वय २३ वर्षे रा. फलके मळा कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. रखाडी ता. वंज्रीगंज जि. गया बिहार याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रशिद हैदरअली खान वय २५ वर्षे रा. फलके मळा कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. रामनगर जि. वाराणसी उत्तरप्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजीव गायकवाड हे करत आहे.







