पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : युवा प्रबोधन साहित्य मंच ,मावळच्या वतीने रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी पुष्पावती बहुले ,सभागृह, नाना -नानी पार्क, तळेगाव दाभाडे. येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष, संस्थापक प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे, यांनी या कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ताथवडे, येथील मराठी विभागाची प्रमुख, प्राध्यापक दिलीप वाघमारे यांना युवा महाराष्ट्र आदर्श प्राध्यापक भूषण पुरस्कार २०२४ देऊन गौरवण्यात आले मानपत्र ,सन्मान चिन्ह व मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्या द्वितीय वर्ष वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला होता.







