सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांना सुनील फल्ले सर व उमाकांत बुगडे सर यांनी सुलाखे हायस्कूल येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी अतिश बाळू पवार हा परिस्थितीने गरजू आहे तो विहिरीत पोहण्यास गेल्यामुळे त्याचे दोन्ही कानाने ऐकायला येत नाही श्रवण यंत्राची गरज आहे अशी मागणी करण्यात आली होती.
संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी श्री चंद्रकांत मुळे सर, श्री गवारे सर, श्री उमाकांत बुगडे सर यांच्याशी संपर्क करून अतिश पवार याच्या कानाची तपासणी करून त्या गुणवत्तेची श्रवण यंत्र उपलब्ध करण्यात आली आज दिनांक 2/ 12/ 2024 रोजी सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी येथे प्राचार्य श्री स्वामी राव हिरोळीकर सर, वर्ग शिक्षका सौ सुनीता कुलकर्णी मॅडम,संतोष पवार सर, हरिदास कुंभार सर तसेच प्रशालेतील पदाधिकारी व ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी व कर्णबधिर मुलांची आई ललिता बाळू पवार यांच्या उपस्थित श्रवण यंत्र देण्यात आले यावेळी प्राचार्य श्री स्वामी राव हिरोळीकर सर यांनी शाळेतील मुलांना श्रवण यंत्र दिल्यामुळे ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानले श्री चंद्रकांत मुळे सर यांनीही आपल्या संस्थेच्या कार्याबद्दल आभार व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रशालेतील संतोष पवार सर यांनी आपल्या भावना व्यक्त करतानाओन्ली समाजसेवा संस्था बार्शी ही तळागाळातील गरजू लोकापर्यंत जाऊन काम करते तसेच आमच्या जाणीव फाउंडेशन गो शाळेला देखील मोठ्या प्रमाणात निधी व चारा वाटप करित असतात बार्शी शहरातील अनेक सामाजिक संघटना काम करीत असून त्यातील एक ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था ही आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यास श्रवण यंत्र दिल्यामुळे संस्थेचे व अध्यक्ष राहुल वाणी यांचे आभार मानले.
श्रवण यंत्र श्री गवारे सर यांनी विद्यार्थ्याच्या कानात बसवल्यानंतर त्याला ऐकू येऊ लागले त्यांच्या आईने व आतिश पवार यांनी आपणास ऐकायला येत असून मी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तम प्रकारे देईन आशी बोलकी भावना मनातून अतिश पवार यांनी देऊन संस्थेचे आभार मानले यावेळी संस्थेचे राहुल वाणी ,सुनील फल्ले, दादासाहेब मस्तूद, नागनाथ सोनवणे, माणकोजी ताकभाते सायरा मुल्ला मॅडम, रेखा विधाते, रागिनी झेंडे, त्रिशाला मिसाळ हे उपस्थित होते तसेच श्रवण यंत्र उपलब्ध करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले असे सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी मानले.







