कार बसला धडकून एमबीबीएसचे ५ विद्यार्थी अपघातात ठार

keral-accident

तिरुअनंतरपूरम (केरळ) : वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार आणि बसच्या भीषण धडकेत ५ एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना कालारकोडे इथल्या चांगनासेरी जंक्शनच्या उत्तरेला १०० मीटर अंतरावर सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

 

वंदनम इथल्या टीडी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी भरधाव कारनं सोमवारी रात्री जात होते. मुसळधार पाऊस सुरू असताना या विद्यार्थ्यांनी आपली कार भरधाव वेगात नेली. यावेळी त्यांची कार आणि केआरटीसी परिवहन विभागाच्या बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात देवनांथन (१९, रा. कोट्टाक्कल, मलप्पुरम ), श्रीदेव वलसन (१९, सेखारीपुरम पलक्कड ), आयुष शाजी (१९, चेन्नाडू, कोट्टायम ) , पीपी मोहम्मद इब्राहिम (१९, आंद्रोथ, लक्षद्वीप ) , मोहम्मद अब्दुल जब्बार (१९, पंड्याला कन्नूर ) अशी मृतांची नावं असून, कारमध्ये तब्बल ११ प्रवासी प्रवास करत होते, त्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं हा अपघात घडल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

 

या अपघातात बसमधील तब्बल १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. तर कारमधील एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीच, तर इतर चौघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या कारमध्ये तब्बल ११ विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती विभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या कारचा अपघात झाला असावा, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here