जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नंबर १ येथे समता सप्ताह दिवस साजरा

samata-saptah-diwas

कन्नड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नंबर 1 या शाळेत कन्नड नंबर 1 व 3 शाळांच्या संयुक्त विद्यमाने, गटशिक्षणाधिकारी निता श्रीश्रीमाळ, जेष्ठ विस्तार अधिकारी सुनिता वेरुळकर,डि.टी.शिंदे, केंद्र प्रमुख बाजीराव ताठे,जि प.प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज समान संधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

 

सर्वप्रथम केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सतिश कोळी यांनी परिपाठात जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व सांगितले. समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2024-25 या शैक्षणिकवर्षात कन्नड तालुक्यातील विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व शैक्षणिक सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांचे शिक्षण पूर्ण करणे तसेच या विभागाअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाबाबत व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाजात, शिक्षण क्षेत्रात सामान्य मुलांमध्ये दिव्यांग मुलाचे हक्क व अधिकार या बाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले.

 

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नंबर 1 येथे सकाळी समता व समानता प्रभातफेरी काढून दुपार सत्रात पाढे वाचन व पाढे लेखन स्पर्धा घेऊन विविध सुप्त कला गुण मागील व चालू वर्षी दिव्यांग विद्यार्थी यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याचे कौतुक केले.

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिलीप गायकवाड यांच्या सहकार्याने ज्येष्ठ शिक्षिका कल्पना सुर्यवंशी यांच्या हस्ते बाॅलपेनचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सतीश कोळी फरहीन पठाण,नाजेमा खान, अर्चना पाटील,सुवर्णा गायके, दिपाली गायकवाड,वर्षा लहाने, डीएडचे प्रशिक्षणार्थी कल्पना तुपे,पल्लवी गायकवाड,निलेश शिनगारे सह माता पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here