जळगाव (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेत दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा अपमान केला आहे.
त्यांच्या विधानामुळे राज्यातील शांतता भंग होवून जातीय व सामाजिक तणाव निर्माण होण्याचा धोका असल्याचे, निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शरदचंद्र पवार यांचेविरुध्द अपमानास्पद व अर्वाच्च भाषेचा वापर या आमदारांनी केला असून, ही कृती महाराष्ट्राच्या शांतताप्रिय संस्कृतीस बाधा आणणारी आहे. तरी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.







