पारोळा (प्रतिनिधी डॉ.दिपक पाटील) : उन्हात पावसात थंडीत व परराज्यात आपले कर्तव्य इमानेइतबारे निभावणारे गृहरक्षक दलाचे जवान यांनी नवनिर्वाचित आमदार अमोल पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी त्यांनी शासनाकडून आतापर्यत ६७० रुपये रोज मानधन मिळत होते. आता शासनाने १२८३ रुपये मानधन केले म्हणून आनंदाचे वातावरण असून गृहरक्षक दल यांना बाराही महिने काम मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यावर आमदार अमोल पाटील यांनी शासन नेहमीच आपल्यासोबत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रातील गृह रक्षक दलाच्या समस्या सोडविण्याविषयी उपस्थितांना आश्वस्थ केले. तसेच गृहरक्षक दलाच्या ७८ वा वर्धापनदिनबद्दल शुभेच्छा दिल्यात.
सत्कार करताना गृहरक्षक दलातील प्रभाकर पाटील ,अरुण पाटील, मयाराम पाटील, नंदू राजहंस, छोटू कासार, अभय पाटील, पंजाबराव बोरसे , वासुदेव भोई, विलास शिंदे, सुनील माळी, भरत कोळी, मिलिंद चौधरी आदी उपस्थित होते.







