भडगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनिष सोनवणे) | चाळीसगाव येथील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळामार्फत लोकसहभागातुन समाजाचे मंगल कार्यालयाचे बांधकाम जोमात सुरु आहे. या मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी जावळे येथे समाजाचे जेष्ट भगवान लोदवाळ, गोरख लोदवाळ यांच्या कुटुंबाने ५६ आर जमीन विनामुल्य दिलेली आहे. याच जागेवरील सुरु असलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामास सत्तेजगड मिर्झापुर वाराणसी परमहंस आश्रम (आडगनंद आश्रम) चे स्वामीजी नारद महाराज यांनी दि. २० रोजी रविवारी ११ वाजता सदिच्छा भेट देऊन समाजाच्या शुभ कार्याबद्दल आशिर्वाद दिला.
स्वामी नारद महाराजांच्या पदस्पर्शाने मंगल कार्यालयाची भुमि पविञ होऊन मंगल कार्यालयाच्या शुभकामास आशिर्वादामुळे बळ मिळाले आहे. यावेळी स्वामीजी नारद महाराज यांचे पुजन करुन त्यांचा शाल व पुष्पहार देऊन उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ, कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग परदेशी , भगवान लोदवाळ , अनिल लोदवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जळगाव लोकसभेचे माजी खासदार नानासाहेब ए. टी पाटील यांचा सत्कार कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग परदेशी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार देऊन करण्यात आला. त्यानंतर भगवंताचे नामस्मरण करीत घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर चहापाण्याचा व प्रसादाचा कार्यक्रम झाला.
स्वामी नारद महाराज वडगाव येथील आश्रमात भंडार्याच्या कार्यक्रमाला जात असतांना त्यांनी जावळे येथील मंगल कार्यालयाच्या कामास भेट देऊन आशिर्वाद दिलेले आहेत. यावेळी उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाल, कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग परदेशी, संचालक सुभाष महाजन, डाॅ. जयसिंग परदेशी, भगवान परदेशी, अशोक परदेशी, सचीव निलेश राजपुत तसेच भगवान लोदवाळ, समाजाचे कन्नड तालुका अध्यक्ष प्रकाश चांदा, जयराम महाजन नागद , हिरालाल महाजन,संपत परदेशी, गोरख लोदवाळ, नंदलाल छानवाळ हरसवाडी, लक्ष्मण छानवाळ, अनिल परदेशी, पांडुरंग सोनार, काॅन्टृॅक्टर दिलीप कुमावत, चंदन महाजन यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.







