सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : आज (दि.१४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास सपोनी विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून कारवाई करत सावदा पोलिसांनी बनावट नोटा बाळगणाऱ्या दोन इसमांना जेरबंद केले.
वरिष्ठ अधिकारी महेश्वरी रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव, राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली विशाल पाटील यांनी त्यांचे पथकातील पोलीस उप निरिक्षक राहुल सानप, स फौ संजय देवरे, पोहेका संजीव चौधरी, पोहेका उमेश पाटील पोहेका यशवंत तहाकडे, पोहेका किरण पाटील ,पोना निलेश बाविस्कर यांचे पथकाने सापला रचून सीताफिने सावदा शहरात बनवत नोटा बाळगणारे दोन संशयित नावे शेख आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान, दोघे राहणार ख्वाजा नगर, सावदा रावेर यांना अटक केली.
यावेळी त्यांच्या ताब्यात भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या ७६ चलनी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण ३७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीताना अटक करण्यात आले आहे. तसेच सदर आरोपिताचा सहकारी असलेल्या एका आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे सावदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.







