पोलिसांनी केला समृद्धी महामार्गावर तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त

crime
file photo

जालना (प्रतिनिधी) : येथील समृद्धी महामार्गावर पोलिसांनी कारवाई करत कंटेनरसह एक कोटींचा गुटखा जप्त केला आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

 

जालन्याच्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरला रात्री पेट्रोलिंग करत असताना ताब्यात घेतलं. अमरावतीकडून मुंबईकडे हा कंटेनर जात होता. यामध्ये १८० गोण्या गुटख्याच्या आढळून आल्या. वाहनासह एकूण १ कोटी २ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

याप्रकरणी ३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापुढेही अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरूच राहील, असं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here