१६ आफ्रिकन नागरिकांना अटक, १२ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

१६ आफ्रिकन नागरिकांना अटक

ठाणे (जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कदम) : नवी मुंबई हद्दीत अंमली पदार्थाची तस्करी करणारे व बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करत १६ अफ्रिकन नागरिकांना अटक करुन १२ कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे , पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे व बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर कारवाईचे आदेश दिलेले होते. या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

 

या कारवाईत वपोनि नितीन बडगुजर यांच्या टीम ने सर्वात जास्त ८,८२,००,००० रुपये किमतीचे कोकन जप्त केले असून तळोजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. भाऊसाहेब ढोले, सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि संदिप निगडे व गुन्हे शाखा कक्षाकडील तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी दि. १२/१२ /२०२४ रोजी गुरूवारी रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कोंबिंग ऑपरेशनद्वारे संयुक्त कारवाई केलेली आहे.

 

या कारवाईमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण १५० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झालेले होते. त्यांनी आयुक्तालय हद्दीमध्ये एकूण २५ ठिकाणी छापा टाकून २ किलो ४५ ग्रॅम वजनाचे कोकेन ( किंमत अंदाजे १० कोटी २२ लाख रूपये), ६६३ ग्रॅम एम. डी. पावडर (किंमत अंदाजे १ कोटी ४८ लाख रूपये), ५८ ग्रॅम मिथिलीन (किंमत अंदाजे ११ लाख ६० हजार रूपये), २३ ग्रॅम चरस (किंमत अंदाजे ३ लाख ४५ हजार रूपये), ३१ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ६ हजार रूपये) असे सुमारे ११ कोटी ८६ लाख रूपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. कारवाईमध्ये १३ अफ्रिकन नागरिक व बनावट पासपोर्ट किंवा विसा बाळगणारे ३ अफ्रिकन नागरिक अशा एकूण १६ अफ्रिकन नागरिकांना अटक केलेली आहे. तसेच कारवाई दरम्यान पासपोर्ट व विसा संपलेल्या ७३ अफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाणेबाबतच्या नोटीस अदा करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here