औरंगाबाद (बिहार) : जिह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सदर घटनेचे गांभीर्य जाणून तडक कारवाई केली आहे. या प्रकरणी त्यांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध स्थानिक पोलीस घेत आहेत. ही घटना फेसर पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये घडली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पांडे यांनी या प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली आहे. “घडलेली घटना फेसर स्थानकाच्या क्षेत्रात घडलेली आहे. या क्षेत्रातल्या एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी राहते. गुन्हातील आरोपी हे मुलीच्या गावचे आहेत. पोलिसांनी लगेच कारवाई करत दोन संशयित आरोपींपैकी एकाचा पकडले. तर दुसरा आरोपी अजूनही फरार आहे”, असे संजयकुमार यांनी म्हटले.
पोलिसांनी घटनास्थळीचा व्यवस्थित तपासणी केल्याचे एसडीपीओ संजयकुमार यांनी सांगितले. त्यांनी सामूहिक बलात्कार करणारे अपराधी हे पीडित मुलीच्या गावात राहणारे दोन तरुण असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाव घेत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी मुलीला जिह्यातील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहितीही संजयकुमार पांडे यांनी दिली आहे.
प्राथमिक तपास झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी संशयित आरोपीला पकडले. आता दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर वैद्यकीय अहवाल तपासून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.







