सोन्याचे बिस्किटासह वीस लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

fir
file photo

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील डॉक्टरांच्या घरात काम करणाऱ्या महिलेने घरातून वेळोवेळी चार लाखांची सोन्याची बिस्किट आणि २० लाख रुपयांची रोकड असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटन उघडकीस आली असून संबंधित डॉक्टरांनी संशयित महिलेविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

 

डॉ. प्रकाश चित्ते यांचे श्री संतुलन हॉस्पिटल नावाने विवेकानंद नगर येथे असून तेथेच ते आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील राहत्या घरात संशयित महिला छायाबाई संग्राम विसपुते हिने मे २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान वेळोवेळी घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट लांबवल्याची तक्रार डॉक्टर प्रकाश तिथे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिल्यावरून संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here