हप्ता न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

marhan
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : दुकानात येऊन समोसा व कचोरी खाल्याचे पैसे मागितल्यावर गुंडांनी दुकान चालू ठेवायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, हप्ता दिला नाही तर दुकान जाळून टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

हा प्रकार वारजे येथील रामनगरमधील धनश्री स्वीट होम दुकानामध्ये शनिवारी सकाळी पावणे दहा वाजता घडला. याबाबत दुकानचालक भरत चौधरी (वय २७, रा. ज्ञानेश सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनीत दांगट व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे वडिल व कामगार धनश्री स्वीट होममध्ये काम करत होते. त्यावेळी विनीत दांगड त्याच्या दोन मित्रांसह दुकानात आला. त्यांनी समोसा व कचोरी खाल्ली़ फिर्यादीने त्याचे बिल मागितले. याचा राग येऊन त्यांनी फिर्यादीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. ‘तुला इथे धंदा करायचे असेल तर आम्हाला व माझ्या मित्रांना दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल. नाही तर तुला इथे धंदा करुन देणार नाही. तुला खल्लास करुन टाकीन व तुझे धनश्री स्वीट होम जाळून टाकीन,’ अशी धमकी देऊन ते बिल न देता निघून गेले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बरसट पुढील तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here