एरंडोल डेपोची बस थांबत नसल्याने वराड येथील प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल

हाल

धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : तालुक्यातील वराड बुद्रुक येथील बस स्टॉपवरती एरंडोल डेपोचे काही बस थांबत नसल्याने तसेच मुसळी फाटाजवळ धरणगाव डेपोचे काही बस थांबत नसल्याने वराड खुर्द व वराड बुद्रुकचे शाळेत जाणारे विद्यार्थ्यांना व प्रवाशांना प्रायव्हेट वाहनाने रिक्षा व तसेच पिकअपच्यामागे लटकून तसेच इतर वाहनाने प्रवास करावा लागत असतो. बस थांबत नसल्यामुळे व प्रायव्हेट वाहन थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असतो.

 

विद्यार्थ्यांना क्लासेस व कॉलेजला जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे त्यांचा महत्वाचा वेळ वाया जात आहे. जळगाववरुन धरणगाव डेपोला जाणाऱ्या बस या परस्पर मुसळी फाट्यावरुन न जाता वराड बुद्रुकच्या बस स्टॉपवर येऊन धरणगावला जायला पाहिजे आणि एरंडोल डेपोची प्रत्येक बस वरा च्या बस स्टॉप थांबायला पाहिजे. या मागणीसाठी वराड बुद्रुकचे दिव्य मराठीचे वरीष्ठ पत्रकार विकास प्रताप पाटील तसेच वराड खुर्दचे बुलंद पोलिस टाईम्सचे वरीष्ठ पत्रकार विनोद विठ्ठल पाटील, वराड खुर्दचे माजी उपसरपंच नरेंद्र रोहिदास ठाकरे यांनी एरंडोल बस डेपोचे मॅनेजर विजय पाटील यांना निवेदन देवून, प्रवासी व विद्यार्थ्यांची समस्या कायमस्वरुपी संपविण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here