सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : गुरुवार (दि.२ जानेवारी) सावदा पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील आगम माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना सावदा पोलीस स्टेशन येथे बोलावून पोलीस स्टेशन बाबत माहिती व मार्गदर्शन करून शस्त्रांबाबत व गोपनीय शाखा व क्राईम शाखा अशा पोलीस स्टेशन अंतर्गत कामांबद्दल माहिती देण्यात आली.
तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तरही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज, पोलीस वापरत असलेले शस्त्र तसेच पोलिस दलाच्या विविध शाखांविषयी प्रश्न विचारले.







