पत्रकार दिनानिमित्त सावदा पोलीस स्टेशन तर्फे पत्रकारांचा सत्कार

सावदा पोलीस

सावदा (जिल्हा क्राइम रिपोर्टर अजहर खान) : येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि 6 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वा सावदा पोलीस स्टेशनमध्ये सावदा व परिसरातील पत्रकांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी. विशाल पाटील, उपपोलिस निरीक्षक अमोल गर्जे, तसेच सावदा येथे सेवा बजावलेले व आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे कार्यरत स.पो.नी. मनोज खडसे आदींची प्रमुख उपस्थितीती होती यावेळी प्रथम सर्व पत्रकार बांधवाना पोलिसांनी तर्फे फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

यावेळी बोलतांना स.पो.नि. विशाल पाटील यांनी समाजत पत्रकाचे स्थान महत्वाचे असून समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतात जे करतांना त्यानं अनेक आव्हाने देखील असतात पण ती सर्व पेलत पत्रकार काम करीत असतो, पत्रकारांनी पूर्वी समाज जागृतीचे काम केले ते काम आज देखील आवश्यक असून समाजातील अनेक चुकीच्या प्रवृत्ती विरुद्ध समाज जागृतीचे मोठे काम पत्रकार करू शकतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले,

 

ब्रम्हपुरी येथील स.पो.नि मनोज खडसे यांनी सावदा अतिशय चांगले मनमिळाऊ शहर असून येथील अनुभव मी सदैव जीवनभर समरणात राहील असा असल्याचे सांगितले तर सावदा उपपोलिस निरीक्षक अमोल गर्जे यांनी देखील सावदा येथील लोक मनमिळाऊ असल्याचे सांगत येथे मला कुटुंबातील सदस्या प्रमाणे प्रेम मिळाल्याचे सांगितले

यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा यावेळी पुष्पगुच्छ व एक सुंदर पेन अशी भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सावदा, चिनावल, वाघोदा, खिरोदा, यासह सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here