पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून गोकुळ नगर कात्रज कोंढवा येथे जनजागृती अभियान तसेच सभासद नोंदणी बैठक आज, दि.८ जानेवारी रोजी घेण्यात आली.
या बैठकीत आज जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी महासंघ चे अध्यक्ष संजय आल्हाट , कल्पना जावळे, लक्ष्मी जाधव, स्वाती कौलघे, कन्हैया पाटोळे ,रुपेश जाधव,राहूल उभे, कैलास पवार,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
महासंघचे काम, मागण्या, केंद्र सरकारचे धोरण,आंदोलनची माहिती दिली व सभासद नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्यांना सभासद होण्या मागचे महत्व पटवून दिले गेले.







