
पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२५’ चे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी,प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता झाले.
आयएमईडी, एरंडवणे, पौड रस्ता, पुणे येथे हे आयोजन करण्यात आले होते. भारती विद्यापीठ आयएमईडीचे संचालक डॉ. अजित मोरे व उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक यांनी स्वागत केले.भारती विद्यापीठ अॅकॅडमीक कौन्सिल चे सदस्य श्रेयस डिंगणकर,डॉ. हेमचंद्र पाडळीकर यांच्यासह प्राद्यापक, स्पर्धक, विधार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेचे हे अकरावें वर्ष होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमधे ही स्पर्धा झाली .प्रथम क्रमांकास रुपये १५ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये १२ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास १० हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.विवेक सावजी म्हणाले की आपण कोणत्याही विद्याशाखेत शिक्षण घेतले तरी समाजाची नाळ जोडलेली असणे आवश्यक असते आणि त्यासाठी अशा वक्तृत्व स्पर्धा उपयोगी पडतात.या स्पर्धा आयोजनामध्ये सातत्य ठेवल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य होत आहे. सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या भाषणामध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेताना चे अनुभव सांगितले. डॉ पतंगराव कदम यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला.
‘भान ठेवून योजना आखा व बेभान होऊन राबवा’-डॉ.पतंगराव कदम ’, ‘राजकारणातील तरुणाईचा सक्रिय सहभाग ’, ‘ रस्ते सुरक्षा -काळाची गरज ‘, ‘ मानसिक स्वास्थ’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता -मित्र कि शत्रू’, ‘ लोकशाहीचे अखंडत्व-ईव्हीएम कि मत पत्रिका ‘, ‘ पत्रकारिता-आव्हाने विश्वासार्हतेची ‘, ‘ प्रकटीकरणाचे सामर्थ्य ‘हे स्पर्धेचे विषय होतें.







