नवी मुंबई महानगरपालिका सफाई कर्मचारी आंदोलनाचा सलग १३ वा दिवस; अधिकार्‍याचे दुर्लक्ष

नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : नवी मुंबई महानगरपालिका विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सलग तेराव्या दिवशी सुरु आहे यामध्ये समान काम समान वेतन कायदा या अधिकारासाठी हे कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत.

 

मात्र अजूनही नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्याचे मात्र सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेमध्ये सुद्धा या कामगारांचा विशेष सहभाग होता तसेच संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान या मोहिमेमध्ये सुद्धा याच कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग पाहिला होता या दोन्ही मोहिमेमध्ये या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेला विविध प्रकारचे पारितोषिक सुद्धा मिळवून देण्यात आलेली आहेत.

 

मात्र याच महानगरपालिकेने तयार केलेल्या समान काम समान वेतन या धोरणामध्ये या कर्मचाऱ्यांचा मात्र समावेश अजूनही झालेला नाही या मागणीसाठी हे कर्मचारी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून त्यांना सहकार्य करावे हीच त्यांची एक प्रमुख मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here