वसई येथे पतंगाच्या नायलॉन मांजाने चिरला दुचाकीस्वाराचा गळा

नायलॉन मांजा

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : पंतगांच्या नायलॉन मांजाने एका दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला आहे. वसईत ही घटना घडली असून सुदैवाने या दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्य़ा सुमारस ही घटना घडली. वसईच्या समर्थ रामदास नगर येथे राहणारे विक्रम डांगे हे आपल्या पत्नी मुलासह फिरण्यासाठी जात होते. यावेळी बाईकवरुन फिरण्यासाठी जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकला.

 

दरम्यान पत्नीने वेळीच मांजा काढल्यामुळे अनर्थ टळला आहे. मात्र विक्रमच्या गळ्यावर खोल जखम झाली आहे. गळ्यावरील जखमी एवढी खोल होती की, त्यामुळे बराच रक्तस्त्राव झाला. यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या गळ्याला ९ टाके पडल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here