आईची भेट करून देतो असे सांगून युवतीवर अत्याचार

rape
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : महाविद्यालयीन युवतीसोबत ओळख वाढवून तिची आईसोबत भेट घालून देणार असल्याची बतावणी करून तिला घरी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. तसेच, या प्रकाराची चित्रफीत तयार करून ती समाजमाध्यमावर पसरवण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कोंढवा येथे आरोपीच्या घरी आणि एका लॉजवर दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

 

पीडीत युवतीने (वय १८) दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी तिच्या १९ वर्षाच्या वर्गमित्राला अटक केली आहे. पीडीत युवती आणि आरोपी हे एकाच महाविद्यालयात शिकतात. आरोपीने पीडीत युवतीला त्याच्या आईची भेट करून देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरी कोणी नसताना तिला घरी आणले आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच, तिच्या नकळत या सर्व प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर, मी ज्यावेळी बोलवेन, त्या वेळेस मला भेटायचे व याबद्दल कोणालाही सांगायचे नाही़, असे म्हणून तिला धमकाविले.

पीडीत युवती महाविद्यालयात गेल्यानंतर तिला चित्रफित समाजमाध्यमावर पसरवण्याची धमकी देऊन तिला दुचाकीवरून लॉजवर नेले. त्यानंतर अत्याचार करून तिला महाविद्यालयात सोडले. दरम्यान, १२ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आरोपीने सांगितलेले न ऐकल्यामुळे आरोपीने पीडीतेच्या कानशिलात लगावली आणि तिच्या हातातील बॅगने तिा मारहाण केली. आरोपीकडून सतत दोन महिने सुरू असलेल्या त्रासामुळे तीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.पोलीस उपनिरीक्षक हसिना शेख याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here