शिक्रापूर- चाकण रस्त्यावर मद्यधुंद कंटेनर चालकाने २५ ते ३० वाहनांना उडविले

मद्यधुंद

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : शिक्रापूर- चाकण रस्तावर चाकण बाजूने येणाऱ्या मद्यधुंद कंटेनर चालकाने अनेक वाहनांना धडक देत, पोलिसांच्या वाहनालाही धडकून थेट शिक्रापूर जवळील जातेगाव खुर्द गाठले. अखेर शिक्रापूर पोलिसांना नागरिकांच्या मदतीने या कंटेनर चालकाला रोखण्यात यश आले मात्र जमलेल्या जमावाने कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. चालकाला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

चाकण- शिक्रापूर रस्त्याने टाटा कंपनीचा कार घेणून जाणारा एच आर ५५ ए व्ही २२८३ हा कंटेनर चाललेला असताना कंटेनर चालकाने चाकणमधील दोन व्यक्तींना धडक देत कंटेनर पुढे आला, यावेळी नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तसाच पुढे जात काही वाहनांना धडक देत पुढे येत राहिला, बहुळ गावाजवळ चाकण पोलिसांनी त्या कंटेनर चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट पोलिसांच्या वाहनाला धडक देत पुढे गेला, त्यांनतर साबळेवाडी मधून कंटेनर चालकाने पुन्हा चाकण बाजूकडे वळण घेत पुन्हा थेट शिक्रापूरकडे निघत करंदी चौफुला येथे एका पिकअप सह एका युवतीला धडक देऊन जातेगाव खुर्द जवळ एका डंपरला ठोस दिली, सदर थरारावेळी चाकणपासून अनेक युवकांनी कंटेनरचा दुचाकीहून पाठलाग केला, यावेळी शिक्रापूर पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला रोखण्यात यश आले,

 

मात्र यावेळी जमलेल्या नागरिकांनी कंटेनरचालकाच्या दिशेने तुफान दगडफेक केली, यावेळी पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी दगडफेक व चालकाला काठ्यांनी मारहाण सुरु असताना शिताफीने कंटेनरच्या आतमध्ये जात चावी काढून घेतली असता जमावाने चालकाला खाली घेत बेदम मारहाण केली, यावेळी सदर चालकाला जबर मारहाण झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले, यावेळी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली.

 

दरम्यान शिक्रापूर व चाकण पोलीस स्टेशन सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूककोंडी सुरळीत केली, यावेळी सदर कंटेनर चालकाचे नाव आकीब अब्दुल रज्जाक (वय २४ वर्षे रा. पचंका जि. पलवल राज्य हरियाना) असल्याचे समोर आले, तर या अपघातात तब्बल वीस ते पंचवीस वाहनांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे मात्र यावेळी सदर संपूर्ण घटनेचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा होऊन अपघातात किती वाहनांचे नुकसान व किती जखमी हे समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here