सोलापूरमध्ये बांग्लादेशींची घुसखोरी; ५ महिला ताब्यात

crime
file photo

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : बार्शीतील पंकज नगर भागात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी उघड झाली असून, याप्रकरणी पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी विरोधी पथक सोलापूर युनिट आणि बार्शी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. या महिलांनी बनावट आधार कार्ड तयार करून बार्शीत वास्तव्यासाठी व्यवस्था केली होती.

कारवाई दरम्यान, पोलिसांनी नजमा यासीन शेख, रेहना बेगम समद शिकदर, अरजिना खातून अन्वर शेख, शिखा शाकिब बुहीया, शाकिब बुहीया, आणि शोएब सलाम शेख या महिलांकडून कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न केले. त्यांच्याकडून एकूण १.४१ लाख रुपयांची रोख रक्कम, ४६ हजार रुपयांचे मोबाईल फोन, बनावट आधार कार्ड, तसेच बांगलादेशी मतदान कार्ड जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भारतीय नागरिक असल्याचे भासवले होते. या प्रकरणी बार्शी पोलिसांनी पारपात्र भारत प्रवेश आणि परकीय नागरिक आदेश ३१८, ३३६, ३३८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. बांगलादेशी नागरिकांनी ग्रामीण भागांत घुसखोरी करत बनावट कागदपत्रांचा वापर केल्याने सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिस तपासणीमध्ये हे महिलांचे समूह कसे आणि कोणाच्या मदतीने भारतात आले याबाबत चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here