यावल (प्रतिनिधी अशोक तायडे) : शुक्रवारी (दि.१७) डोंगर कठोरा येथील महिला महाविद्यालय मुलींचे हिवाळी शिबिर झाले संपन्न झाले.
डोंगरदा पाडा हे आदिवासी गाव आहे येथील डोंगरदा पंत मंदिर येथे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर देण्यात आले खुल्या वातावरणात मुलींनी आदिवासी वस्तीमध्ये जाऊन श्रमदान केले पाड्यावरील स्वच्छता करण्यासंदर्भात जनजागृती केली तसेच बालविवाह मुक्त भारत व बाल अपव्यपार प्रतिबंध बाल लैंगिक शोषण प्रतिबंध बालकामगार प्रतिबंधक या संदर्भामध्ये आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यावल तालुका कॉर्डिनेटर अशोक तायडे यांनी मुलींना मार्गदर्शन केले व आदिवासी पाड्यावर रॅली काढून पथनाट्य सादर केले पथनाट्य मधून एक चांगला संदेश दिला गेला.
यावल ग्रामीण रुग्णालय यांच्या अंतर्गत मुलींना एचआयव्ही एड्स संदर्भामध्ये वसंतकुमार संदानशिव समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले त्यांचे सहकारी लिंक वर्कर पवन जगताप व महिला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भोळे सर, विजय वाकेकर सर, श्री.मोरे सर, श्री.कुरकुरे सर, श्री.पाटील सर, श्रीमती शकुंतला भारंबे, शिपाई ललित पाटील, वजीर तडवी हे उपस्थित होते. मुलींचे पथनाट्य कु पल्लवी तायडे दीपाली तायडे सर्व राहणार न्हावी यांनी पथनाट्य सादर केले.







