आमदार सौ.सीमाताई हिरे यांच्या भुखंड घोटाळ्याविरोधात पायी मोर्चा

आमदार सौ.सीमाताई हिरे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नाशिक पश्चिमच्या आमदार सौ.सिमाताई हिरे यांनी केलेल्या भुखंड घोटाळ्यां विरोधात नाशिक ते मुंबई राज्यपाल भवन व ईडी कार्यालय येथे पायी मोर्चा काढला आहे. या पायी मोर्चातील शेतकऱ्यांना नाशिक महापालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भेट दिली.

 

त्याप्रसंगी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. आजपर्यंत हा ५ वा मोर्चा शेतकऱ्यांनी नेला आहे, अद्यापही त्यांना न्याय मिळत नाही आहे. ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

या पायी मोर्चात, साहेबराव दातीर, बंडू दातीर, माणिक दातीर, सुखदेव दातीर, गोरख दातीर, योगेश दातीर, हेमंत दातीर, शांताराम पडोळ, भाऊसाहेब दातीर, चंद्रकांत दातीर, अविनाश पडोळ, शरद कर्डेल, मनोज दातीर, महेश दातीर, बारकू दातीर, विष्णू दातीर, संतु दातीर, सिताराम दातीर, अरुण दातीर, प्रकाश कर्डेल, सुभाष कर्डेल, राजेंद्र दातीर, प्रकाश दातीर, सोमनाथ दातीर, भाऊराया दातीर , भास्कर दातीर, विक्रम दातीर असे ४० ते ५० प्रकल्प ग्रस्त शेतकरी सहभागी आहेत. ह्या मोर्चाचे नेतृत्व अंबड येथील शेतकरी साहेबराव दातीर हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here